- Dr.Vikhe Patil Foundation
SAHITYIK MASTI CLUB (Marathi) – July
साहित्यिक मस्ती
तारीख :- १८/ ७/ २०१४
वेळ :- ८ ते ११
ठिकाण :- आर्ट रूम
विषय :- वारली चित्रकला व शिल्पकला यांची भाषा
वक्ते :- श्री. धनंजय राव.
सुरुवातीला प्रथमेश नाईक याने पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर सरांनी वारली चित्रकलेचा पाया काय आहे ते सांगितले. पूर्वीच्या काळी चित्रांद्वारे माणूस आपले विचार कसे व्यक्त करीत असे हे सांगितले. नंतर विद्यार्थ्यांनी स्वतः वारली चित्रे काढली. सरांनी चित्रांचे स्पष्टीकरण दिले की कसे आपले चित्र आपल्या मनातले विचार व भावना सांगतात.

दुसऱ्या सत्रात सरांनी शाडूच्या मातीपासून शिल्पकला कशी करतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. नंतर विद्यार्थ्यांना माती देऊन त्यांच्याकडून शिल्पे बनवून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून वेगवेगळी शिल्पे बनवली, जसे स्नोमॅन, वडापाव, क्रिकेटचे मैदान त्या खेळाच्या साहित्यासह, फुलपाखरू इ. विद्यार्थ्यांनी मातीत हात घालून काहीतरी स्वतः बनविण्याचा आनंद घेतला.
सरांनी शिल्पकलेतून देखील बनवणाऱ्या माणसाची मानसिकता कशी ओळखू शकतो हे सांगितले. विद्यार्थी माती घरी घेऊन गेले व त्यांना हे आवर्जून सांगण्यात आले की घरी देखील सतत वेगवेगळ्या कलाकृती बनवत रहा.


