• Dr.Vikhe Patil Foundation

SAHITYIK MASTI CLUB (Marathi)

साहित्यिक मस्ती

तारीख :- २८ जून २०१४

वेळ :- ८ ते ११

ठिकाण :- मराठी रूम

विषय :- इतिहासातील भाषा

वक्ते :- श्री. गणेश धालपे व अजित टाकळकर

          सुरुवातीला कल्याणी पाटील हिने पाहुण्यांची ओळख करून दिली, व त्यांचे फूल देऊन स्वागत केले. विषयाची सुरुवात त्यांनी विविध भाषांच्या लिपींची ओळख करून देऊन केली. यामध्ये त्यांनी सिंधू, हडप्पा, मोहंजोदाडो इ. संस्कृतीची ओळख करून दिली. महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे अशी प्राचीन संस्कृतीची दर्शनस्थळे आहेत हे सांगितले. लिपींचा प्रवास त्यांनी अत्यंत रंजक पद्धतीने सांगितला जसे ब्राह्मी, खरोष्टी, मोडी, देवनागरी इ. शिलालेख व स्तंभलेखांची माहिती दिली. 


       चित्रलिपी कशी वाचावी हे शिकवले. यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील व प्राचीन काळातील मंदिरे व लेण्यातील चित्रे व प्रस्तरलेख यांच्या स्लाईड्स दाखविल्या. वीरगळ कशी वाचावी हे शिकवले. जमिनीवरील किल्ले व समुद्रातील किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांवरील शिल्पांची भाषा व त्त्यांचा अर्थ कसा जाणावा हे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत समजावून दिले. त्यानंतर त्यांनी अजंठा येथील एक शिल्प दाखविले व त्यामधील गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. 

      सर्वात शेवटी त्यांनी खुद्द शिवाजी महाराज, शहाजी महाराज व जिजाऊबाईंनी लिहिलेली पत्रे प्रत्यक्ष दाखविली व विद्यार्थ्यांना हाताळायला दिली.

      त्यांच्या संपूर्ण सादरीकरणामध्ये त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली की आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा इतिहास किती प्राचीन व वैभवशाली आहे व आपल्याला त्याचा अभिमान हवा.


0 views

Dr. Vikhe Patil Foundation

 

At the Dr. Vikhe Patil Foundation, you’ll find stories of work that is improving lives, from rural to urban Maharashtra.

OPEN

MON-FRI 9:30 AM - 6:00 PM

SIGN UP TO RECEIVE UPDATES FROM DR. VIKHE PATIL FOUNDATION

By clicking Sign Up, you agree to the Dr. Vikhe Patil Foundation's terms & conditions for sending you our updates.

Follow Us:

2019-2023 © Dr. Vikhe Patil Foundation, Pune || Proudly Engineered by Brisingr GameTec Pvt Ltd